‘येथून’ दारूचा मोठा साठा चोरीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- वडगाव गुप्ता परिसरातून परमिट रूम फोडून चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक अशोक गायकवाड (रा. सिव्हिल हडको, नगर) यांचे नगर-मनमाड रस्त्यालगत वडगाव गुप्ता परिसरात परमिट रूम आहे. रेनॉल्ट शोरूम शेजारी असलेल्या या परमिट रूमची पाठीमागील खिडकी तोडून काल पहाटे चोरटे आत घुसले.

आत घुसून विविध कंपन्यांच्या 5 लाख 55 हजार रुपयांच्या देशी, विदेशी, दारू, बियर, वाईनच्या बाटल्या चोरून नेल्या.

सकाळी गायकवाड यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी विवेक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24