लॉरेन्स स्वामी यांना पुन्हा अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-दोन दिवसापूर्वी जामिनावर सुटलेले लॉरेन्स स्वामी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

भिंगार पोलीस ठाण्यामध्ये लॉरेन्स स्वामी यांच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात स्वामी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

भिंगारमध्ये 23 नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळी फुलचंद जोशी हे आपल्या गाडीतून जात असताना त्यांना लॉरेन्स स्वामी यांनी आपल्याकडील फॉर्च्यूनर आडवी मारून त्यांच्याजवळील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पन्नास लाखांची खंडणी मागितली पैसे न दिल्यास तुझ्या भावाला ठार मारेल अशी धमकी दिली.

याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाले आहे, या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामी यांना अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24