अहमदनगर ब्रेकिंग : रोहित पवारांची साथ सोडून जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Breaking : मिरजगाव जिल्हा परिषद गटातील माजी जि.प. सदस्य परमवीर पांडुळे यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांची भेट घेतली असून, आगामी राजकीय वाटचाल भाजपमधून करणार असल्याचे सूतोवाच केले. थेरगाव येथे सांत्वनपर भेटीसाठी आ. शिंदे नुकतेच आले होते.

त्यावेळी त्यांची आणि परमवीर पांडुळे यांची बैठक झाली. बैठकीसाठी भाजपाचे कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी शिष्टाई करत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत व आ. रोहित पवार यांना धक्का देत परमवीर पांडुळे यांची भाजपमध्ये घरवापसी सुनिश्चत केली आहे.

या वेळी परमवीर पांडुळे आणि त्यांचे समर्थक बापू साळवे, आशिष उर्फ भाऊ शिंदे, थेरगावचे सरपंच मिनिनाथ शिंदे, शहाजी कुटे आदी उपस्थित होते. आ. शिंदे यांच्याशी राजकीय सल्ला मसलत करत

पांडुळे यांनी प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा करून लवकरच आपण आ. शिंदे व खा. सुजय विखे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

या वेळी भाजपा कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते अॅड. शिवाजीराव अनभुले, जिल्हाध्यक्ष भटक्या विमुक्त जाती सेल गणेश पालवे, भाजपा तालुका समन्वयक पप्पूशेठ धोदाड, मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळस,

थेरगावचे सरपंच मिनिनाथ शिंदे, उपसरपंच बाळासाहेब महारनवर, राहुल गांगर्डे, चंद्रकांत महारनवर, राजेंद्र शिंदे, नागमठाणचे सरपंच देविदास महारनवर, अमृत शिंदे, पंडीत रायकर, अण्णा महारनवर, काका पिसाळ, राहुल महारनवर आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.