कमळ सोडत त्यांनी हाती घड्याळ बांधले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगलेच रंगले आहे.नुकतीच मनपा स्थायी समिती सभापतींच्या निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची घटना ताजी असतानाच, आता कर्जत मतदार संघातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

आमदार रोहित पवार यांना भाजपा नगरसेवकांनी वाढदिवसानिमित्त सरप्राईज दिले. बापूसाहेब नेटके व मनीषा सोनमाळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी आणि त्यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सोनमाळी यांचेसह डॉ. प्रकाश भंडारी,

सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वानी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष

नितीन धांडे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी उद्योजक दादासाहेब थोरात, सुनील शेलार आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24