शहर झोपडपट्टीमुक्त करू : आमदार संग्राम जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : नगर शहरातील प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर असावे यासाठी मी राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून संजयनगर झोपडपट्टी येथे २९८ घराचा प्रकल्प साकार होत आहे.

नगर शहर हे झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी संजयनगर येथील २९८ घराच्या प्रकल्पामधील अडचणी सोडवणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

संजयनगर येथील घरकुल प्रकल्पाच्या कामाची पाहणी करताना जगताप बोलत होते. यावेळी चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अॅड. प्रसन्ना जोशी, प्रकल्प अभियंता आर. जी. मेहेत्रे, सुमित कुलकर्णी,

अमित गटणे, स्नेहालयाचे हानिफ शेख, वित्त सल्लागार इर्शद कुरेशी, वित्त पुरवठा अधिकारी बर्वे, निलेश बांगरे व स्वप्नपुर्ती घरकुल योजनेतील सर्व लाभार्थी यावेळी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, वित्त संस्थांना आवश्यक असणारी कागदपत्रे येथील कष्टकरी समाजास तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी चाणक्य संस्थेमार्फत संजयनगर झोपडपट्टी भागात स्नेहालय परिवाराच्या सहकार्याने एक खिडकी योजना सुरू करुन सदरचे घरकुलाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

अभियंता मेहेत्रे म्हणाले, सुमारे दिड हजार पेक्षा जास्त बेघर व्यक्तींना हक्काचे कायम स्वरुपी घर मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाला आहे.

प्रत्येक घरकुलासाठी स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे. या योजनेत सहभागी असणाऱ्या सर्व नागरिकांना सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत. लाभार्थींना लवकर स्वत:च्या हक्काच्या घरात कायमस्वरुपी राहाता येईल, यासाठी मनपा प्रशासन कटीबद्ध असल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24