ब्रेकिंग

ओळखा पाहू आम्ही कोण?? बाजार समितीत लावलेल्या ‘त्या’ फलकाचीच चर्चा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन पाहायला मिळाले.

या फ्लेक्स बोर्डवर एक मजकूर होता त्याची चर्चा बाजार समितीच्या आवारात चांगली रंगली आहे.

सध्या जिल्हा परिषद, बाजार समिती, सोसायट्यासह स्थानिक पातळीवरील विविध संस्थाच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत.

त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन पाहायला मिळाले.

युवकांनी बाजार समितीच्या आवारात एक फ्लेक्स लावला होता.

त्या बोर्डवर ‘बेकायदेशीर कामे करून आम्ही बाजारपेठ व शेतकरी संपवणारच ओळखा पाहू आम्ही कोण असा’ मजकूर होता त्याची चर्चा बाजार समितीच्या आवारात चांगली रंगली आहे.

Ahmednagarlive24 Office