अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- बलात्काराची केस मागे घे म्हणत एका 26 वर्षीय तरुणीच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात घडली होती
ह्या संतापजनक घटनेचे प्रतिसाद राज्यभर उमटले असून आमदार नीलम गोऱ्हे यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान अहमदनगर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी राजाराम तरटे याला अटक केले आहे, तर दुसरा आरोपी अमोल तरटे अद्याप फरार आहे. या प्रकरणात आमदार नीलम गोऱ्हे यांनी विशेष लक्ष घालत थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे.
आरोपींना जामीन किंवा पेरॉलवर सोडताना न्यायालयाकडून घालून देण्यात आलेल्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी आणि कठोर कारवाई पोलिसांकडून होणे गरजेचे असल्याचं मत यावेळी नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.
नीलम गोऱ्हेंच्या मुख्य मागण्या
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved