अहमदनगर मध्ये होतेय चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अहमदनगर शहरात लॉकडाऊनमध्ये चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

शहरातील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका ग्णवाहिकेतून दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी कारवाई करून रुग्णवाहिका जप्त केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे.

राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू असल्याने दारूची दुकानेही सध्या बंद आहेत. मात्र, छुप्या मार्गानं दारूविक्री सुरूच असल्याच्या एक एक घटना पुढे येत आहेत.

सरकारी रुग्णालयाच्या परिसरात एका दुचाकीवरून दारूचे बॉक्स वाहून नेत असल्याची माहिती तोफखाना उपनिरीक्षक समाधान साळुंके यांना मिळाली होती. 

त्यानुसार, साळुंके आणि पथकानं दुचाकीला अडवून दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले. या दोघांकडे कसून चौकशी केली. 

त्यावेळी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका रुग्णवाहिकेतून दारू पुरवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिके मध्ये झडती घेतली. त्यात एक दारूचा बॉक्स सापडला.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी कारवाई करून रुग्णवाहिका जप्त केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24