पारनेर तालुक्यातील ‘या’ भागात लॉकडाऊन घोषित !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेला कुंभारवाडी येथील तरूण, पंचायत समितीचा बाधित ग्रामसेवक,

तसेच ढवळपुरीच्या ठेकेदाराने

पंचायत समिती व शहरात केलेला संचार, तसेच कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथील रूग्णाने शहरातील रूग्णालयात घेतलेले उपचार

या पार्श्र्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून पारनेर शहर अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईहून आलेल्या बाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या पाच नातेवाईकांना कोरोनाची बाधा झाल्याने १४ दिवसांसाठी पिंपळगावरोठा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.

वडनेर बुद्रूकमध्ये कोरोनाबाधित मृताच्या संपर्कात आलेल्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले असून गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24