सर्वात मोठी बातमी : पुन्हा वाढला लॉकडाउन वाचा सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे.

त्यानुसार देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केली.

मोदी सरकारनं आणखी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन चालु राहणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24