अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- कुरियरने तलवारी मागविणार्या जामखेड मधील एका तरुणाला एलसीबीने अटक केली आहे.
त्या तरुणाविरुद्ध काल रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्या तरुणाकडून चार तलवारी आणि एक चार चाकी वाहन असा सुमारे साडे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात एलसीबीला यश आले आहे.
या तलवारीला नगर शहरातील दिल्ली दरवाजा येथील एका पत्त्यावर त्या तरुणाने मागविले आहे अशी माहिती एलसीबीला मिळताच त्यांनी दिल्ली दरवाजा येथे सापळा लावून त्या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास आता एलसीबी करत आहे.