दौंड महामार्गावरील अपघातात चाैघांनी गमावला जीव,तालुक्‍यामध्ये शोककळा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- दौंड महामार्गावरील पवारवाडी शिवारात दुचाकी व ट्रक अपघातात प्रतिक नरसिंग शिंदे, राजकुमार विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे व राहुल बाजीराव बरकडे रा.पवारवाडी हे चौघे मित्र ठार झाले.

पवारवाडी येथे हे चौघेही शेजारी – शेजारीच रहायला असल्याने त्यांची जिवाभावाची मैत्री होती. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्‍यामध्ये शोककळा पसरली आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. समजलेली अधिक माहिती अशी, बाजीराव बरकडे, राज विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे व प्रतीक नरसिंग शिदे या चौघांनी बुलेट मोटारसायकलीवरून प्रवास करत होते.

पवार फाट्याजवळ उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना नगरकडून दौंडकडे जाणारी ट्रक (एमएच ११ एम ५६६२) व बुलेटची (एमएच १६ बीएन ७७७१) यांची समोरासमोर जोरात धडक झाली. यात बाजीराव, राज, विशाल व प्रतीक हे चाैघे जागीच ठार झाले.

अहमदनगर Live24

च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

अहमदनगर लाईव्ह 24