जिल्ह्यात पुन्हा जोर बैठका; व्यायाम शाळा होणार सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. त्यामध्ये अनेक ठिकाणे बंद करण्यात आली. परंतु मिशन बिगिन अंतर्गत आता हळू हळू सर्व गोष्टी सुरु होत आहेत.

हॉटेल, बियरबारनंतर आता राज्य सरकारने मिशन बिगेनअंतर्गत जीम, व्यायाम शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात व्यायाम शाळा सुरु होणार आहेत.

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मान्यतेने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी काढले आहेत. जिल्हा प्रशासनाने करोनाचे नियम पाळून 30 नाव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात जीम आणि व्यायाम शाळा सुरू करण्यास

परवागनी दिली आहे. यासह निर्बंध असणार्‍या सेवा सध्या बंद राहणार असून राज्य सरकारच्या आदेशानूसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24