अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- टाळेबंदीनंतर सर्वसामान्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला असताना झोपडपट्टी भागातील नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रांत आहे.
अशा परिस्थितीमध्ये लालटाकी येथील महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने दसर्या निमित्त महालक्ष्मी मातेचा यात्रा उत्सव रद्द करुन भंडार्याच्या माध्यमातून या भागातील नागरिकांचा दसरा गोड करण्यात आला.
भाजप दलित आघाडीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, राजू काळोखे, सचिन रोकडे, विशाल रोकडे, श्याम वाघमारे, अमर यादव, अनिता काते, शांताबाई खंडागळे, सोनू मिसाळ, साखराबाई रोकडे आदी उपस्थित होते.
साहेबराव काते म्हणाले की, टाळेबंदीत अनेकांना नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत. तर हातावर पोट असलेल्या झोपडपट्टी भागातील नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठिण असताना सण साजरा करण्याचा तर प्रश्न अधिकच गंभीर आहे. नऊरात्री निमित्त सर्व भाविक उपवास करत असतात.
या भागातील नागरिकांच्या घराघरात भंडार्या माध्यमातून दसर्या निमित्त गोड खाद्य पदार्थाचे वाटप व्हावे या भावनेने या भंडार्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. भंडार्याच्या माध्यमातून या भागातील झोपडपट्टीत घरोघरी मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved