Maharashtra Police Bharti 2022 : पोलिस भरतीला स्थगिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Bharti 2022 :- दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुमारे १७ हजार पदांच्या पोलिस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे.

१ नोव्हेंबरपासून ही प्रकिया सुरू होणार होती. तथापि, प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे.

ही जाहिरात प्रसिदध करण्यासंबंधीची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे, असे पोलिस महासंचालक (प्रशिक्षणे व विशेष पथके) संजय कुमार यांनी कळविले आहे.

मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत.

अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय.

कुठे किती जागा आहेत?
मुंबई – 6740
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720

पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204

अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68

रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131

नाशिक ग्रामीण – 454
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24

पुणे ग्रामीण – 579
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39

नांदेड – 155
परभणी – 75
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132

भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348

गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण – 156
अकोला – 327
बुलढाणा – 51

यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण – 14956

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811
अनुसूचित जमाती – 1350
विमुक्त जाती (अ) – 426
भटक्या जमाती (ब) – 374

भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) – 292
विमुक्त मागास प्रवर्ग – 292
इतर मागास वर्ग – 2926

इडब्लूएस – 1544
खुला – 5468 जागा
एकूण – 14956