अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेले तिघाडी बिघाडी झाल्यामुळे सरकार संभ्रमावस्थेत आहे. त्यात सरकारने कोरोनाच्या संकटात योग्य ते नियोजन न केल्यामुळे संकटाची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
अपयशी सरकारमुळे साथीच्या आजारात महाराष्ट्राचा एक नंबर असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था ढासाळली आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी कार्यकारणी जाहिर केली आहे. या कार्यकारणीत माजी आमदार कोल्हे यांची प्रदेश सचिव पदासाठी निवड झाल्याबद्दल पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्चायाचा सत्कार केला.
त्याप्रसंगी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कोरोना सारख्या आजारामध्ये रुग्णसंख्याही वाढत आहे. दुर्दैवाने महाराष्टाचा साथीच्या आजारात एक नंबर आला आहे, दुर्दैवाने अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोना संकटाच्या वेळी राज्य सरकार अपयशी ठरले. रुग्णांची हेळसांड, खासगी दवाखान्यामध्ये होणारी आर्थिक लुट, कुठे व्हेंटिलेटर नाहीत,
तर कुठे टेस्ट वेळेवर होत नाही. अशाप्रकारचे हाल कोविड रुग्णांचे होत अाहेत. राज्य सरकारमुळेच सामान्य गोरगरीब जनतेला त्रास होत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews