Ahmednagar breaking : श्रीगोंदा तालुक्यातील चिभळे येथे जमिनीच्या वादातून गावठी बंदुकीतून गोळीबार करत फरार झालेला मुख्य आरोपी जयदीप दत्तात्रेय सुरमकर याच्या बेलवंडी पोलिसांनी चिखली परिसरात मुसक्या आवळ्याची माहिती पोलिसांनी दिली.
दि. १० ऑक्टोबर रोजी तालुक्यातील चिंभळे परिसरात जयदीप सुरमकर याने जमिनींच्या वादातून संतोष उर्फ लाला गायकवाड याच्यावर गावठी पिस्टलमधून सहा गोळ्या झाडत लाला गायकवाड यांना गंभीर जखमी केले होत.
या घटनेनंतर या गुन्ह्यातील आरोपी सुरमकर फरार झाला होता. आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेसह बेलवंडी पोलिसांची पथके शोध घेत होती. मात्र, या आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी मोबाईल घरी ठेवला होता.
परिणामी, त्याचे ‘लोकेशन’ शोधण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी आज त्याला चिखली शिवारात पकडले.दरम्यान चिंभळे गोळीबार प्रकरणात बेलवंडी पोलिसांनी सुरमकर याचा साथीदार सचिन उर्फ चिंग्या सोपान भागवत याला अटक केली असून,
तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात अजून काही आरोपी वाढण्याचीदेखील शक्यता व्यक्त केली जात आहे.