मका खरेदी केंद्रे त्वरितसुरू करावीत : कोल्हे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- कोपरगाव शहर | शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने आधारभूत योजनेंतर्गत मका खरेदी करण्यास सुरूवात केली, परंतु अल्पावधीतच खरेदी बंद करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.

राज्य शासनाने त्वरित केंद्र पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेलहला कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.

कोरोनाच्या बिकट परिस्थितीतून सावरण्याची धडपड शेतकरी करत आहेत. समाधानकारक पावसामुळे सुदैवाने पिकांच्या उत्पन्नात वाढ झाली. मका खरेदी करण्यास राज्य शासनाने सुरूवात केली, परंतु अल्पावधीत ही केंद्र बंद पडली.

राज्य सरकारने मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24