नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! पारनेरच्या शेतकऱ्याने केले ‘असे’ काही अन आठ महिन्यात कमावले 40 लाख

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  शेतीवरील संकटांची नेहमीच चर्चा होते. दुष्काळ मग तो ओला असो व सुका त्याचा परिणाम हा ठरलेलाच. अनेक शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्याची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेण्यात येतो. मात्र काही शेतकरी आपल्या जिद्दीच्या जोरावर हे सर्व अडथळे पार करत मातीतून यशाचं पीक फुलवतात.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील शेतकऱ्याची अशीच एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. या शेतकऱ्याने पेरूच्या बागेतून आठ महिन्यात तब्बल 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. बाळासाहेब गुंजाळ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दहा एकर पेरू शेतीतून त्यांनी 14 महिन्यात 40 लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.

तसेच आणखी तीन महिन्यांमध्ये त्यांना 20 लाखाचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. बाळासाहेब गुंजाळ यांनी तैवान पिंक नावाच्या पेरूच्या शेतीतून प्रगती साधली आहे.

खतांसाठी जास्त खर्च नाही :- तैवान पिंक पेरूला खुप मागणी आहे. 400 ते 900 ग्रॅम या पेरूचे वजन असते. हा पेरू अतिशय मऊ आणि गोडीला कमी असतो. या कारणामुळे या पेरूला मागणी जास्त आहे. या पेरूची टिकण्याची क्षमता जास्त असल्यामुळे या पेरूला लांब लांबच्या बाजारपेठेत पाठवता येते. त्यामुळे उत्पन्नात घट होत नाही.

या पेरूची बाग फुलवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यांनी बागेला कोंबडी खत आणि शेणखत पुरवले होते. रोज प्रत्येक एकराला अर्धा तास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले गेले. या पेरूसाठी रासायनिक खताची आजिबात गरज नाही, अशी माहिती बाळासाहेब गुंजाळ यांनी दिली आहे.

काय आहे खासियत :- त्यांना तैवान पिंक पेरू खुप नफा मिळवून देत आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. सध्या सगळीकडे त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची चर्चा होत आहे. तैवान पिंक ही नवीन पेरूची जात असून या पेरू ला मोठी मागणी आहे. साधारण 400 ते 900 ग्रॅम पर्यंत वजन असलेला हा पेरू अतिशय मऊ आणि गोडीला कमी आहे.

त्यामुळे याला मागणी जास्त आहे. बाबासाहेब गुंजाळ यांनी दहा एकरावर वर्षभरापूर्वी या पेरूची लागवड केली. एकरी साधारण साडेआठशे झाडं तर दहा एकरात साडेआठ हजार झाडांची लागवड करण्यासाठी त्यांना आठ लाख रुपयांपर्यंत खर्च आला.

पेरूच्या लागवडीनंतर अवघ्या आठ महिन्यातच पेरूचे उत्पादन सुरू झाले. चार महिन्यापासून गुंजाळ यांनी त्यांच्या बागेतून 40 लाखांचे पेरू विकले आहेत आणि आणखी चार महिन्यात साधारण वीस लाखांचे पेरू विकले जातील असे बाळासाहेब गुंजाळ यांनी सांगितलं.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24