अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भारतीय जनता पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदी मनोज कोकाटे यांची मंगळवारी नियुक्ती झाली. नगर तालुक्याबरोबरच जामखेड तालुकाध्यक्षदी अजय काशीद व पारनेर तालुकाध्यक्षपदी वसंतराव चेडे यांची नियुक्ती झाली आहे. भाजपच्या दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी ही नियुक्ती केली आहे.
नगर तालुकाध्यक्षपदावर नियुक्त झालेले मनोज कोकाटे यांनी यापूर्वी भाजपच्या युवा मोर्चाचे काम पाहिले आहे. कोकाटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे भाजपच्या नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते, माजी पालकमंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी अभिनंदन केले आहे.
माझ्यावर पक्षाने नगर तालुकाध्यक्षपदाची टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल, तसेच नगर तालुक्यात भाजपची संघटना मजबूत करण्याबरोबर पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कुठलेही गटातटाचे राजकारण होणार नाही, असे नियुक्तीनंतर कोकाटे यांनी सांगितले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com