फक्त घोषणाबाजी करुन मराठ्यांना मराठा नेत्यांनी फसविण्याचे काम केले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसुन समितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन छावा संघटनेकडे दहा दिवस सूत्रे सोपवावीत. दहा दिवसांत आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो.

आणि जर आरक्षणासाठी मंत्री, आमदार, खासदार यांनी सहकार्य केले नाही, तर संघटनेचा छावा त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा, छावा संघटनेचे केंद्रीय कार्यध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला. ते बुधवारी श्रीरामपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, कार्यध्यक्ष देवेंद्र लांबे, सुभाष जंगले, अतुल जुबंड, निलेश बनकर, शैलेश वाघ, विजयकुमार बडाख, सुरेश कुंजीर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जावळे म्हणाले, प्रत्येक सरकारने मराठा समाजाचा फक्त वापर केला.

मराठा समाजाच्या कल्याणासाठी व आरक्षणासाठी कुणी काहिही केले नाहीत. मराठा समाजातील ४२ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यावेळी त्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये व वारसाला सरकारी नोकरी देण्याचा आदेश शाससाने पारित केला होता. मात्र त्यालाही केराची टोपली दाखविण्यात आली.

प्रत्येक सरकारमध्ये अनेक मराठा मंत्री असतात. व अनेक मराठा आमदार, खासदार असुन फक्त घोषणाबाजी करुन मराठ्यांना मराठा नेत्यांनी फसविण्याचे काम केले. अशा नेत्यांना निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24