अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- जाणीव परिवार या संस्थेच्या वतीने सलग सहाव्या वर्षी राजगुरूवाड्यावर एक हजार दीप लावून शहीद राजगुरु यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शहीद राजगुरू यांचे वंशज येथील विलास राजगुरू यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी विलास राजगुरू म्हणाले, “या देशासाठी राजगुरू परिवार ४०० वर्षांपासून कार्यरत आहे. शिवाजी महाराजांनी त्यांचे कार्य सिद्धीस जाण्यासाठी पूर्वज सिद्धेश्वरभट ब्रह्मे यांच्याकडून अनुष्ठानही करवून घेतल्याचा उल्लेख महाराजांनी लिहिलेल्या पत्रामध्ये आहे.
सन १८५७ च्या राष्ट्रीय उठावात हुतात्मा राजगुरू यांचे सख्खे चुलत आजोबा देवराव राजगुरू यांनी तात्या टोपे यांना मदत केली होती. ते दोघे मित्र होते. तसेच टोपे यांची मावस बहीण या हुतात्मा राजगुरू यांचे चुलत आजी होत. तसेच भारतीय सैन्यातील लान्स नाईक शरद राजगुरू यांचे भारत-चीन युद्धात मोठे योगदान होते.
पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात ते शहीद झाले.” काव्या ड्रीम मुव्हीज यांची निर्मिती होत असलेल्या ‘क्रांतिसूर्य राजगुरू’ या वेबसिरीसची माहिती त्यांनी या वेळी दिली.आशिष निनगुरकर या वेबसिरीजचे लेखन करत असून सिद्धेश राजगुरू क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. या वेळी जाणीव परिवाराच्या वतीने हजारो पणत्या लावण्यात आल्या होत्या.
त्या उजेडाने राजगुरूवाडा उजळून निघाला होता. मयुर पाचारणे यांनी बासरीवर, तर संदीश शिंदेकर यांनी ढोलकीवर देशभक्तिपर गीते सादर केली. शशिकांत पावडे यांनी हुतात्मा राजगुरू यांची रांगोळी साकारली होती. अरुण गुरव यांच्या हस्ते राजगुरू यांच्या जीवनपटावरील फ्रेम देऊन विलास राजगुरू यांचा विशेष सन्मान करण्यात केला.
वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अजिंक्य बकरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. अतिक सय्यद, अमोल वाळुंज, शैलेंद्र बकरे, ऋषिकेश सारडा, रोहित बेलसरे, श्रेयस अहिरे, ओंकार कहाणे, सौरभ लुणावत, प्रसाद निंबाळकर, हितेश शेटे, अभिजित घुमटकर, संदिश शिंदेकर, सुमित खन्ना, सुजित डावरे,
श्रीराज चव्हाण, अमर टाटिया, मच्छिंद राक्षे, अभिजीत तापकीर, मयूर पाचारणे, रोहित बोरुडे,निखिल सातकर,आदी जाणीव परिवारातील सदस्य उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved