महापौर समर्थक बालिश,मयूर पाटोळेंचा पलटवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  आदरणीय महापौर बाबासाहेब वाकळे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही केली आहे , परंतु महापौरांच्या समवेत त्यांच्या समर्थकांना देखील ही मागणी झोबली आहे.

पण सत्य हे कटू असते ते आम्ही जनतेच्या समोर मांडले आहे, आमच्या मागणीला प्रतिउत्तर देताना महापौरांचे समर्थक अतिशय बालिश बुध्दीचे आहेत

असे वक्तव्यावरून दिसून येते ,हे महापौर भाजपचे असल्याने यांचे देखील मोदी प्रमाणे अंधभक्त आहेत, यांना महापौरांचे फारच काम दिसतेय परंतु वास्तव्य वेगळे आहे,

रुग्ण संख्या आटोक्यात नाहीय , मुर्तदेहाची विटंबना होण्याचे प्रकार, लॉकडाऊन मध्ये कचरा घोटाळा आसेल अासे अनेक प्रकरणे पण महापौर ह्यावेळी सुधा कुठेच दिसले नाही व फक्त बालिश समर्थकांना ते सक्षम दिसतात ,

मी करोणा संकट काळात काम न केल्याचे खोटे आरोप ते करत आहेत. त्यांनी डोळे उघडावे आधीच्या वर्तमान पत्रातून व सोशल मीडिया वरून

माहिती घ्यावी आदरणीय सत्याजीत तांबे यांच्या मार्गद्शनाखाली आम्ही काय कामे केलीत, असे चोख प्रतिउत्तर युवक काँग्रेसचे शहरजिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे यांनी दिले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24