अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात उगवून आलेल्या ज्वारी पिकावर लष्करी अळीचा पादुर्भाव फार मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान मोठया प्रमाणात होत आहे.
त्यामुळे या रोगावर उपाययोजना करून शेतकर्यांना सहकार्य करावे असे निवेदन शेतकरी सेनेच्या वतीने श्रीगोंदा तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
यावेळी तालुका प्रमुख रघुनाथ सपकाळ, ड.रमेश जठार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उजागरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान जिल्ह्यासह तालुक्यात मोठ्या पाऊस झाल्याने शेतकर्यांनी रब्बी ज्वारी पेरणी मोठ्या प्रमाणात केली असून काही दिवसापूर्वी ढगाळ वातावरणाने उगवून आलेल्या ज्वारी पिकावर मोठया प्रमाणात लष्करी अळीचा पादुर्भाव झालेला दिसून येत आहे.
या रोगामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो त्यामुळे या अळीचा अटकाव करून रोगावर उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी सेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.