‘दुधाला १० रूपये अनुदान मिळालेच पाहिजे; अन्यथा मोठे संकट’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील बळीराजा शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुधाचाच व्यवसाय करतो. यातूनच त्याची आर्थिक प्रगती साध्य होत असते. परंतु सध्या दूध उत्पादकांची ससेहोलपट सुरु आहे.

त्यामुळे त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे खूप मोठा धोका ओढवून घेतल्यासारखे आहे. हा व्यवसाय आणि त्यावर आधारीत असलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी

सरकारने प्रती लिटर दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी दूध उत्पादकांनी मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांकडे केली आहे.

गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना याबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे,

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मुंबई यांच्यामार्फत सहकारी संघांकडून दूध रुपांतरासाठी घेण्यात येत होते.

मात्र एकूण संकलनाच्या अतिशय नाममात्र प्रमाणात खरेदी केले जात आहे. तेही दि.27 जुलै 2020 पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सद्य:स्थितीत शासनाने दूध उत्पादकांना खरेदी केलेल्या दूध दराप्रमाणे सर्व दुधावर दर द्यावा लागत आहे. त्यामुळे संघांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दूध उत्पादक शेतकर्‍यांची परिस्थितीही बिकट झाली आहे. कारण पशुखाद्य, चारा, पाणी, मिनरल मिक्चर या वस्तुंचे दर गगनाला भिडलेले आहे,

त्यामुळे उपलब्ध असलेले पशुधन जगविणे शेतकर्‍यांना अवघड झालेले आहे. ही गंभिर परिस्थिती विचारात घेता दूध उत्पादक शेतकर्‍यांना सर्व उत्पादीत दुधावर अनुदान मिळणे गरजेचे आहे, अन्यथा या व्यवसायावर संकट ओढवेल असे निवेदनात म्हटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24