अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला होम कॉरांटाइन केले आहे.
बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी २० जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले आहे.
देशभरात कोरोनाने सामान्य नागरीकांबरोबरच राजकीय नेते यांना विळखा घातला आहे.
यापूर्वी अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांनाही करोनाची लागण झाली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews