अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : राज्याचे नवनियुक्त उर्जा व नगरविकास, आदिवासी तथा उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल पाचवेळा आमदार असलेलेे भाजपा नेते शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला. राज्यातील अनेक राजकीय घडामोडीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत सरकारमध्ये त्यांना ज्येष्ठनेते शरद पवार यांनी संधी देत सहा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविली.
मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना नगराध्यक्षपदासाठी पुरेसा वेळ राहुरी शहरातील प्रश्नांना वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील विकासाची गती कमी होऊ नये, म्हणून राजीनामा देत असल्याचे त्यांनी ना.तनपुरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे राजीनामा सूपूर्द केला असून तात्पुरता कार्यभार उपनगराध्यक्षा राधा साळवे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.