के के रेंज विस्तारीकरणाबद्दल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील के. के. रेंजमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनींसंदर्भात पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अँड स्कूलचे लेफ्टनंट कर्नल रोहित वाधवान, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे उपस्थित होते. लेफ्टनंट कर्नल वाधवान यांनी रेंज एक व दोनमध्ये समाविष्ट जमिनींविषयीची माहिती दिली. 

फायरींग रेंजसाठी नगर, पारनेर व राहुरी तालुक्यातील उपयोगात आणण्यात येणाऱ्या जमिनी आणि आवश्यक वाढीव जमिनींचा तपशील सादर केला. 

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, शेतकऱ्यांनी मुळा धरण, कृषी विद्यापीठ व के. के. रेंजसाठी जमिनी दिल्या आहेत. फायरिंग रेंज विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीसंदर्भात ग्रामस्थांमध्ये संभ्रम असल्याने तपशीलवार माहिती सादर करण्यात यावी. 

विस्थापितांची काळजी घेतानाच सर्वांना विश्वासात घेऊन या प्रकरणी निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करावी. जमिनीच्या मागणीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव लष्कराकडून जिल्हा प्रशासनास सादर झालेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यावेळी दिली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

 

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24