अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ मंत्री कोरोना पॉझिटिव्ह,म्हणाले कितीही बचाव केला तरी….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राजकीय नेतेही कोरोनाचे शिकार होतांना दिसत आहेत,आमदार मोनिका राजळे यांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपुरे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना करोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत:च व्टिट करून करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

‘सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे,

काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार, असे व्टिट त्यांनी केले आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंत्री, आमदारांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. यात नगर जिल्ह्यातील आ.मोनिका राजळे तसेच आता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24