मंत्री तनपुरे म्हणाले रस्त्याचा प्रश्न लवकरच सोडवू …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील करंजी ते जोडमोहज या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी मला भेटून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. या रस्त्याच्या कामासाठी कोरोनाचे संकट दूर होताच निधी देणार असल्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

करंजी येथील मुखेकर,अकोलकर,मुटकुळे वस्तीवरील ग्रामस्थांसाठी महत्वपुर्ण ठरणाऱ्या करंजी ते जोडमोहज या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून

अनेक ठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत हा रस्ता डांबरीकरणाने जोडा असे कळकळीचे आवाहन मच्छिंद्र अकोलकर, नामदेव मुखेकर, महादेव अकोलकर, अॅड. संदीप अकोलकर, ताराबाई मुटकुळे, बाळासाहेब मुखेकर,

भगवान मुखेकर, रघूनाथ अकोलकर, मुरलीधर बंदरकर, राहुल अकोलकर, बाळासाहेब हाडे यांनी केले. पाण्याचा प्रश्न सोडवला. लवकरच रस्त्याचा प्रश्नही सोडवू अशा शब्दात मंत्री तनपुरे

यांनी करंजी ते जोडमोहज रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही येथील ग्रामस्थांना दिली. जोडमोहज रस्त्यावर खड्डा खोदून हा रस्त्याच्या वाहतुकीस अडथळे आणणाऱ्या प्रकाराबाबतही मंत्री तनपुरे यांनी तहसीलदार वाडकर यांना याबाबत लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24