आमदार जगतापांचा पारा चढला; प्रशासनाला धरले धारेवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत भयावह झाली आहे. यातच जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे.

ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे, दुसरीकडे ऑक्सिजनचा आलेला टँकर बंद पडतो आदी संकटे समोर उभी ठाकली आहेत. दरम्यान उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत असून, प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक बंद आहेत.

प्रशासनाचा कारभार रामभरोसे सुरू आहे, अशा शब्दांत आ. संग्राम जगाताप यांनी जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त केला.

निष्क्रिय अधिकाऱ्यांची खरडपट्टी :- रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. एक एक इंजेक्शनसाठी नातेवाइकांची अक्षरश: धावपळ सुरू आहे.

रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पी. एन. कातकडे व उपजिल्हाधिकारी किशोर कदम या दोन अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत.

या दोन्ही अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कदम हे फोन उचलत नाहीत, अधिकाऱ्यांवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही.

अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. जनतेसाठी खुले केलेले किती संपर्क क्रमांक बंद असतात, याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24