अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- श्रीराम मंदिर बांधण्यासाठी ठिकठिकाणी जे ‘निधी संकलन अभियान चालू आहे त्यावर आ.लहू कानडे यांनी टीका करून नवीन वाद निर्माण केला आहे.
श्रीरामपूर येथील विविध हिंदू संघटनांनी श्रीराम भक्तांनी तसेच श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी निषेध केला आहे.
राजेंद्र सोनवणे यांनी पत्रक काढून निषेध व्यक्त करतांना आ.कानडे यांच्यावर ‘गदार’ या शब्दात टीका केली आहे. सविस्तर बोलतांना सोनवणे यांनी म्हटले आहे की,
आमदार निवडून आले हिंदूंच्याच मतांवर निवडणुकीच्यावेळी आमदार होण्यासाठी कानडे यांनी भिक मागितली होती व आम्ही स्वत: त्याचा प्रचार करून हिंदुंची मते मिळवून दिली होती व त्याच मतावर ते आमदार झाले.
आज ते गद्दारीचा ‘कळस करून काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यावर फडकावित आहेत. वास्तविक पाहता श्रीराम मंदिर बांधण्यासाठी श्रीराम भक्त जो निथी ‘सकंलन करीत आहे हे काम अत्यंत प्रामाणिकपणे असून कोणालाही बळजबरीरी करण्यात आलेली नाही.
श्रीराम मंदिर उभारणीसाठी प्रत्येक हिंदूचा सहभाग असावा, हा निधी संकलनाचा हेतू आहे. आ.लहू कानडे यांनो यास खंडणी शष्द वापरून स्वत:चे ज्ञान दाखविले असताना काँग्रेस पक्षाचा आधार घेत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील जनता कानडे यांना माफ करणार नाही. ते काँग्रेस पक्षालाही भविष्यात अडचणीत आणतील. त्यांनी श्रीरामाबद्दल बोलताना श्रीराम हे हिंदुच देवत आहे याची जण ठेवावी . त्यानी टीका करून खंडणी शब्द वापरला आहे. त्याचा जाहीर निषेध या पत्रकाद्वारे करण्यात येत आहे.