अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अतिपावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे संबधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक करीत नसल्याची तक्रार आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली.
आमदार कानडे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार पाठवल्याचे त्यांनी सांगितले. यंदा झालेल्या अतिपावसामुळे शेतातील खरीप पिके उदवस्त झाली आहे. शेतात पिकेच उभी नसल्याचे सांगून पंचनामे करण्याचे टाळले जात असल्याचा आरोप आमदार कानडे यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यात दरवर्षी मोठया प्रमाणात कांद्याचे उत्पादक घेतले जाते.
परंतू तालुक्यात यंदा सर्वत्र झालेल्या अतिपावसामुळे कांदा बियाण्याचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांनी हजारो रुपयांची कांदा रोपे मातीमध्ये टाकली आणि पावसामुळे खराब पिके झाली. अनेक शिवारातील शेतपिकांत पावसाचे पाणी साचल्याने खरीपाचे पिके खराब झाली. काहीअंशी उरलेल्या पिकांची शेतकर्यांना काढणी केली.
शेतातील पिके काढली असुन उत्पन्नात मोठी घट आली असुनही शेतात पिके उभी नाहीत म्हणुन अशा ठिकाणचे पंचनामे टाळळेली आहेत. तसेच शेतकरयाने कापणी केली असे म्हणून जी पिके आज शेतात उपलब्ध नाहीत तेथेही पंचनामे टाळली जात आहे.
प्रशासकीय कर्मचारयांनी शेतकरयांकडे चौकशी करुन उत्पन्नाची घट आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच रब्बी हगांमासाठी शेताची पुढील मशागत करण्यासाठी कापलेल्या पिकांची पंचनामे टाळले असुन पुन्हा एकदा गावनिहाय नुकसनीचे पंचनामे करण्याचा आदेश काढण्याची मागणी कानडे यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved