अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पाथर्डी शहरात ८० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील नागरिकांना घाबरू नका, सतर्क रहा, प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.
आमदार राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेल्या आठवड्यापासून पाथर्डी शहर व तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
ह्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 17 जुलै ते 23 जुलैपर्यंत पाथर्डी शहर कंटेन्मेंट झोन घोषित केले आहे. आ. राजळे यांनी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण,
तहसीलदार नामदेव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रत्नपारखी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी चर्चा करून
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी संयम पाळावा, सतर्क रहावे, घाबरू नये स्वतःची काळजी घ्यावी, लग्र समारंभ,
धार्मिक कार्यक्रम, भाजी बाजार आदी ठिकाणी गर्दी करणे टाळावे. सुरक्षित अंतर ठेवून, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करुन
स्वत:च स्वत:ची काळजी घ्यावी व कोरोनाची साखळी तोडण्यास तालुका नगरपालिका, पोलीस, आरोग्य विभाग व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com