अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- ग्रामपंचायत सदस्य होण्याची परिस्थिती नसतांना प्रस्थापितांच्या विरोधात मी आमदार होतोय एवढे पुष्कळ आहे. लोकांनी स्वत:च्या पैशातून लोक वर्गणी करून निवडून आणले.
आता कोरोना रूपाने समाजातील लोकांवर वेळ आली असून ते ऋण फेडण्याची वेळ आहे. समाजातील लोकांसाठी असे काम करा पुढचे वीस पंचवीस वर्ष लोक नाव घेतील.
असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले. पाथर्डी येथील एका कार्यक्रमात आमदार लंके बोलत होते. यावेळी आ.लंके म्हणाले,
शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात आजपर्यंत ८ हजार कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले. प्रत्येक कोरोना रुग्णांसाठी सकारात्मकतेने उपचार पद्धती मानसिक आधार दिल्याने कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना आजारात ८० टक्के रुग्ण हे भीतीने मृत्यू झाले आहेत. पुढच्या जन्मावर माझा विश्वास नाही याच जन्मात असे काही काम समाजासाठी करा की येणारी पिढीने तुमचे नाव काढले पाहिजे.
पाथर्डी तालुक्याची भूमी पवित्र असून हे माझे माहेरघर आहे. आमदार करण्यात पाथर्डीचा मोठा वाटा आहे. येथील माझ्याकडे येणारा माणूस माझ्यासाठी प्रेमाचा आहे. या तालुक्याने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. हे विसरू शकत नाही.