अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कामाबाबत जाहीरपणे कौतुक केले होते. तसेच त्यांच्या या कार्याला सलाम देखील केला होता.
पंकजा मुंडे यांच्या या ट्विटवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे.
पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा, असं म्हणत रोहित पवारांनी पंकजा मुंडे यांचं कौतुक केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काम करण्याच्या शैलीचं आणि तडफदारपणाचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कौतुक केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही भाजपा नेत्या पंकजा मुंडेंवर स्तुतिसुमनं उधळली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved