अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- युवकांनी सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून काम केले पाहिजे. चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. शहर व उपनगरांच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी सांगितले.
राष्ट्रवादी युवकचे सचिव तनवीर मन्यार यांनी स्वखर्चातून उभारलेल्या हायमॅक्सचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरसेवक सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे वैभव ढाकणे, अल्ताफ सय्यद, अंकुश चत्तर, सजाद बागवान, प्रताप गायकवाड,
साजीद इनामदार, राहुल सांगळे, राजू शेटे, काकासाहेब झेंडे, संजय कांडेकर, साजीद शेख, सादिक शेख, शाहीद शेख, राजू सरमाने आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, निर्मलनगर येथील जॉगिंग ट्रॅक नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे. या जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांनी लावलेली झाडे मोठी झाली आहेत.
या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फिरण्यास येत असतात. महापालिकेच्या खुल्या जागेत जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करु.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved