आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- आमदारकी गेल्यापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेल्याने त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंती लागली आहे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शिवसेनेची नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी.

अशी टीका अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव बेरड यांनी केली. माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी एका कार्यक्रमात बोलताना खा. शरद पवार यांच्यावर ‘शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आणि तसाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय’ अशी टीका केली होती.

त्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शविसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्डीले यांच्यावर निशाणा साधला आहे. या टीकेला शिवसेनेचे नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, गोविंद मोकाटे व राष्ट्रवादीचे केशव बेरड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बेरड यांनी म्हटले आहे, की शिवसेना व राष्ट्रवादीने कर्डिले यांना राहुरी मतदारसंघात चारी मुंड्या चित केले.

आजवर शिवसेना साथ देत होती, म्हणूनच तुम्ही आमदार होत होतात. कर्डिलेंनी स्वतःच्या मुलाला राजकारणात आणण्यासाठी पुतण्यांना राजकारणात येऊ दिले नाही. जो कुटुंबाचा वाली झाला नाही, तो कार्यकर्त्यांचा काय होणार, या भावनेने कार्यकर्तेही दूर जात आहेत.

नगर तालुक्‍यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाआघाडीनेच तुम्हाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत धूळ चारली, हे विसरू नका. आमदारकी गेल्यापासून ते स्वतःच कार्यकर्त्यांना बोलावून घेतात. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोठमोठी विधाने करतात.

काय म्हणाले होते माजी आ. कर्डीले :- जिल्हा बॅंकेच्या वतीने गोपालनासाठी शेतकऱ्यांना खडकी येथील एडीसीसी बँकेत कर्जवाटपाच्या कार्यक्रमानंतर माजी आ. कर्डिले यांनी ‘ सध्या कोरोनामुळे लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री बाहेर फिरत नाहीत.

ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र या वयातही बाहेर फिरतात. याचा अर्थ शिवसेना संपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बाहेर फिरू दिले जात नाही. राष्ट्रवादीची संघटना वाढविण्याचा त्यामागे हेतू दिसतो, या सर्वामागे असा हेतू दिसतोय की शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आणि तसाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय,’ अशी टीका केली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24