अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थिती लोकप्रतिनिधींनी नागरिक व प्रशासनातील दुवा बनून प्रतिबंधात्मक उपाय व मदतकार्य यावर भर देणे अपेक्षित असताना स्वतः आमदारानेच नियम मोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे आमदार जगताप यांचे निवासस्थान असलेला परिसर कंटेन्मेंट झोन केला होता. आज अनेक लोकप्रतिनिधींनी आपले वाढदिवस साधेपणाने साजरे केले.
पक्षाचे कार्यक्रमही साधपणाने होत आहेत. लोकांना मदत करण्यावर लोकप्रतिनिधींचा भर आहे, अशा परिस्थिती राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी गर्दी जमवून दणक्यात वाढदिवस साजरा केला.
याबाबत शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे कोरोनाच्या काळात नियम मोडल्याने व्यापारी किंवा सामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई होते, मात्र काही विशेष लोकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार केली होती.
अखेर दोन दिवसांनी जगताप यांच्यासह त्यांच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आमदारांनी कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते तर कार्यकर्ते प्रेमापोटी भेटीला आले होते, असा दावा आता आमदार जगताप यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews