अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-जिल्ह्याचा क्राईम रेकॉर्ड दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दरदिवशी होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे भाजी मंडईतुन मोबाईल चोरण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत योगेश बाबासाहेब आंबेडकर वय ३८, धंदा नोकरी, रा. राहुरी फॅक्टरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
की, १७.१.२०२१ रोजी सकाळी ११.३० वा. राहुरी फॅक्टरी येथोल भाजी मंडईत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने आपला मोबाईल चोरून नेला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकां आव्हाड हे करीत आहेत.