अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : पाथर्डी शिरापुर येथे बापानेच अकरा वर्षे वयाच्या मुलीचा साखरपुडा पंचवीस वर्षे वयाच्या पुरुषाबरोबर करुन बालविवाह लावण्याचा प्रयत्न केला. शनिवारी शिरापुर येथे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. याबाबत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
मुलीचा बाप, विवाह करणारा मुलगा, त्याचा भाऊ व वडील अशा चौघाविरुद्ध पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. नवरदेव त्याचा भाऊ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरापुर येथे बापु दौलत गवारे हा उसतोडणी कामगार राहतो. त्याला दोन मुली व एक मुलगा आहे. मोठी मुलगी तिच्या आईच्या माहेरी खुंटेफळ (ता.शेवगाव )येथे मामाकडे राहत होती.
सहावीच्या वर्गातुन तिला घरी शिरापुर येथे वडीलांनी आणले. सहा जुन २०२० रोजी दिलीप खंडागळे, रामा खंडागळे ( नवरदेव) , गौतम खंडागळे रा. हासनापुर (कोळगाव) हे शिरापुर येथे आले. मुलीचा बाप बापु गवारे याने मुलीचा साखरपुडा करुन विवाह करावयाचा आहे असे पत्नीला सांगितले. तिने विवाहाला विरोध केला.
त्यानंतर मुलीला घेवुन वरील चौघेजण तिसगाव येथे गेले तेथुन मुलीला व मुलाला नवीन कपडे आणले. सायंकाळी साडेपाच वाजता मुलीला घेवुन हे चौघेजण गेले व त्यांनी साखरपुडा करुन विवाहाची तयारी केली. मुलगी घेवुन गेल्याने आईने ही हकीगत तिच्या माहेरी भाऊ व वडीलांनी सांगितली. मुलीचा चुलता यानेही या विवाहाला विरोध केला.
मात्र माझी मुलगी आहे मी काहीही करीन व विवाह लावुन देईल असे सांगितले. तुम्ही कोणी मधे येवु नका असे सांगितले. मुलीचा आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मुलीचा बाप, नवरदेव ,त्याचा भाऊ व नवरदेवाचा बाप अशा चार जणाविरु्दध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम १९२९ चे कलम नऊ, अकरा नुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब) , कोवीड २०२० चे कलम ११, साथरोग १८९७ कलम २,३,४ नुसार यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
नवरदेव (रामा) व त्याचा (गौतम) भाऊ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकट- मुलीचा बाप बापु गवारे याला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे त्याने असे कृत्य केले असल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्ह्टले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews