अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- जिल्ह्यासह शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोऱ्या आता नागरिकांसाठी डोकेदुखी बानू लागल्या आहेत. यातच शहरात पुन्हा चोरीची घटना समोर आली आहे.
नगर औरंगाबाद रोडवरील तवलेनगर परिसरातून बाळू काशिनाथ धारक यांची २५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची सीबी शाईन ही मोटारसायकल (क्र.एमएच १६, सीएम ९०४३) चोरट्याने चोरुन नेली.
ही घटना २८ ते २९ जानेवारी दरम्यान घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुढील तपास पोना. जाधव हे करत आहेत.
दरम्यान, मोटारसायकल चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. भरदिवसा मोटारसायकल चोरल्या जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन नुकतीच मोटारसायकल चोरीची घटना घडली होती.
दरम्यान मोटारसायकल चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.