अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप मनसुखलाल गांधी (वय ७०) यांचे बुधवारी पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तेथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या पार्थिवावर अहमदनगरमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात भाजपचा विस्तार करण्यात मोठा वाटा गांधी यांचा होता. नगरसेवक ते केंद्रीय राज्यमंत्री हा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता.
स्व. दिलीपजी गांधी यांचे शव घेऊन निघालेली शववाहिनी आज दुपारी 3 वाजेपर्यंत नगर शहरात पोहचेल, दुपारी 4 वाजे पर्यंत अंत्ययात्रेस सुरवात होईल. अंत्ययात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे आहे.
असा असेल अंत्ययात्रा मार्ग… :- स्व.दिलीप गांधी यांचे निवासस्थान, गुरुदेव आनंद ऋषीजी समाधी, बुरुडगाव रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, हाय वे वरून मार्केटयार्ड चौक,
बंगाल चौकी, बांबू गल्ली, चर्च रोड, गांधी यांचे जुने निवासस्थान, माणिक चौक, नगर अर्बन बँक चौक, नवी पेठ, नेता सुभाष चौक, भाजप कार्यलय, आनंदी बाजार, नालेगाव मार्गे अमरधाम येथे अंत्यसंस्कार