खासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते ! आता..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- विधानसभा निवडणूकीत ज्यांच्यासाठी भांडलो, ज्यांच्यावर टिका केली, ज्यांच्याशी वाईटपणा घेतला आता तेच सत्तेसाठी एकत्र आले आहेत, मी मात्र एकटा पडलो आहे. आता सरकार पडणार असल्याचे वर्तमानपत्रांतून ऐकतो आहे.

तसे झाले तर आता ज्यांच्यावर टिका करायची त्यांच्यासोबतच एकत्र बसण्याची वेळ आली तर काय करणार ? त्यामुळे बोलताना सावध भुमिका घ्यावी लागत असल्याचे

सांगत खा. विखे आत कोणाशीच वाईटपणा नको असे येथे बोलताना सांगितले. बेल्हे ते राळेगणथेरपाळ रस्त्याच्या १६ कोटी रूपये खर्चाच्या कामाचे खा. विखे यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.

त्यावेळी आयोजित कार्यक्रमात विखे बोलत होते. जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सभापती गणेश शेळके, भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्‍विनी थोरात, पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे,

सचिन वराळ, राहुल शिंदे, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर, सरपंच पंकज कारखिले, उपसरपंच योगेश आढाव, राज्य महामार्गाचे उपअभियंता गोरक्षनाथ गवळी यांच्यासह विविध गावांतील नागरीक यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24