खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले शिवसैनिक भाजपसोबत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- ‘शिवसेनेच्या नेतृत्वाने आपला स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवला आहे मात्र आजही शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपसोबत असल्याची याची खात्री आहे, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी पारनेर येथे दूध आंदोलना वेळी केला.

‘राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केले, जेलमध्ये गेले, शहीद झाले, ते मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारतात, राम मंदिराच्या भूमिपूजनच्या दिवशी भाजपबरोबर असतील याची खात्री आहे.त्यांचे मत परिवर्तन होताना दिसेल.

याचे परिणाम महाविकास आघाडीला भविष्यात निश्चितच पाहण्यास मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सरकार हे जनतेच्या मनाच्या विरोधात बनवले गेले आहे.

फक्त आमदारांनी व मंत्र्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आघाडी केली आहे. कार्यकर्त्यांच्या मनाच्या विरोधात हे करण्यात आले आहे.आजही खालच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नाही,

असा आरोप करतानाच शिवसेनेचा कार्यकर्ता हा राममंदिराच्या मुद्द्यावर भाजप बरोबर असल्याचा दावा त्यांनी केला.महाविकास आघाडी सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे.

दूध दराबाबत राज्य सरकार उदासीन आहे. फक्त त्यांच्याकडून घोषणा केली जाते.पण दुसरीकडे शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यामुळेच आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे
        क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24