अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधी कामांनिमित्तानं मतदारसंघामध्ये फिरत आहेत.
त्यांचा कोरोना बाधित लोकांशी संपर्क येत आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांना करोनाची लागण झाली आहे.
शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलालाही करोनाची लागण झाली असून पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. खासदार सदाशिव लोखंडे श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे राहतात.
त्यांच्या वाहनचालकाला त्रास जाणवू लागल्याने त्याची करोनाची चाचणी केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचं निदान झालं.
त्यानंतर लोखंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची आणि चालकाच्या संपर्कात आलेल्यांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यावेळी लोखंडे आणि त्यांची पत्नी आणि मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना झाले आहेत. दरम्यान, लोखंडे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात दौरे करीत होते.
अलीकडेच श्रीरामपूर शहरातील एका मोठ्या कार्यक्रमातही ते इतर मान्य नेत्यांसमवेत उपस्थित होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांना आणि त्यांच्या पत्नीला करोनाचा लागण झाली होती.
शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना करोनाची लागण झाली आहे. यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना करोनाची लागण झाली आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. या सर्वांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved