खा.शरद पवार व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भेट; खा. सुजय विखे करणार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे.

राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली असून नागरिक चिंतेमध्ये असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंकेंसह नुकतीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

त्यानंतर के के रेंजसाठी जमीन संपादित होणार नसल्याची ग्वाही संरक्षण मंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता खासदार डॉ. सुजय विखे पाटील

यांनी याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक खुलासा व माहिती कागदपत्रांच्या आधारे आपण लवकरच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मांडणार असल्याचे स्पष्ट केल आहे.

दरम्यान, पाठीमागे यासंदर्भात दिल्लीत सरंक्षणमंत्री आणि लष्कर प्रमुख यांच्यासोबत खा. विखे यांनी चर्चा केली असून त्याचा तपशील माजी आ. शिवाजीराव कर्डिले आणि मी बाधित

तालुक्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांना देणार असल्याचे खा.डॉ. विखे यांनी सांगितले होते. के. के. रेंजसाठी भूसंपादन झाल्यानंतर आवश्यकतेनुसार अतिरिक्त जमिनीला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

40 वर्षांपासून रेड झोन असताना लष्कर अतिरिक्त जमीन संपादन करणार ?, अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे ? आणि यापूर्वी जाहीर झालेल्या रेड झोनबाबत काय भूमिका आहे. याबाबत संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांची विस्तृत चर्चा खा. सुजय विखे यांनी मागे केली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24