खा.सुजय विखे म्हणाले नगर जिल्‍ह्यास वेठीस धरण्‍याचा प्रकार …मृत्‍युसंख्‍येबाबत सविस्‍तर अहवाल तयार करुन यावर भाष्‍य करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- आपला जिव धोक्‍यात घालून कोरोना संकटात सेवा देणा-या डॉक्‍टरांच्‍या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान अतिशय अक्षेपार्ह असुन, याबद्दल त्‍यांनी देशातील डॉक्‍टरांची माफीच मागितली पाहीजे अशी मागणी भा.ज.पा चे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली. 

इतरांना काही कळत नाही आणि यांनाच सर्व कळत असेल तर राज्‍यातील कोरोना त्‍यांनी घालवून दाखवावा असा खोचक सल्‍लाही त्‍यांनी दिला. लोणी बुद्रूक येथे दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांबाबत महादूध आंदोलनात खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सहभाग घेवून मुख्‍यमंत्र्यांना पत्र पाठविले.

त्‍यानंतर माध्‍यमांशी बोलताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यावर निशाणा साधला. माझ्यासह देशातील प्रत्‍येक डॉक्‍टर कोरोनाच्‍या या संकटात स्‍वत:चा जीव धोक्‍यात घालून रुग्‍णांना सेवा देत आहे. त्‍या डॉक्‍टरांबद्दलच अशा पध्‍दतीने विधान केलेल्‍या  विधानचा त्‍यांनी तिव्र शब्‍दात निषेध केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारनेच सर्व काही करावे अशी अपेक्षा असेल तर स्‍वत:च्‍या स्‍वार्थाकरीता जनतेने नाकारल्‍यानंतरही तीन पक्षानी एकत्रित येवून स्‍थापन केलेल्‍या महाविकास आघाडी सरकारला जनतेला न्‍याय देवून आमच्‍या मागण्‍या मान्‍य कराव्‍या लागतील.

राज्‍यातील महाविकास आघाडी सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळणार असेल तर त्‍यांनी सत्‍तेत पायउतार होवून भाजपाकडे राज्‍य सुपूर्त करावे असे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सुचित केले.

ज्‍यांचे जिल्‍हे लॉकडाऊन आहेत असे पालकमंत्री, आरोग्‍यमंत्री नगर जिल्‍ह्यात येवून जिल्‍हा लॉकडाऊन होणार नाही असे जाहीर वक्‍तव्‍य करतात. नगर जिल्‍ह्यास वेठीस धरण्‍याचा प्रकार असून, जिल्‍ह्यात रॅपीड अॅन्‍टीजन टेस्‍ट होत असल्‍या तरी आर्टीफीशीएल टेस्‍ट केली जात नाही. यावर आमचा आक्षेप कायम असून, नगर जिल्‍ह्यात झालेल्‍या मृत्‍युसंख्‍येबाबत आपण सविस्‍तर अहवाल तयार करुन लवकरच यावर भाष्‍य करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24