अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती राष्ट्रवादीने केली होती. त्यामुळे आम्ही माघार घेतली.
पण केवळ एका निवडणुकीवरून कुणी राजकीय अंदाज बांधू नये. जिल्ह्यातील राजकीय गणितांचा भविष्यात उलगडा होत जाईल.
‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही.आगामी काळात आमचा वेगळा पॅटर्न दिसेल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर विखे पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत महाराष्ट्रामध्ये नगरचा प्रथम क्रमांक आहे.
केंद्र शासनाच्या अखत्यारित असणाऱ्या सर्व योजनांचा आढावा घेऊन प्रकल्प पूर्णत्वाला कशा पद्धतीने जाईल, याची जबाबदारी मी घेतली आहे.
जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना फायदा मिळाला आहे. दोन टप्प्यांत रक्कम देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.