अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- दक्षिण मतदार संघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी आढावा बैठक घेऊन नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे सरसकट पंचनामे करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिरायत असलेल्या जमिनीवर शेती ज्याठिकाणी होते, त्यांना बागायत नोंद ७/१२ वर लावून घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.
जिल्ह्यातील इतर विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय महामार्गच्या भूसंपादन, के.के. रेंज व अन्य प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरसकट पंचनामे करून अनुदान वर्ग करण्यात यावे अशी विनंती केली. याप्रसंगी पारनेर तालुक्याचे सुजित जावरे, तालुकाध्यक्ष वसंत चेडे उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved